0

एका बायकोची दुसरी गोष्ट (खासकरून विवाहित मित्रांनी लक्ष देवून वाचा.)

काही दिवसांपूर्वी मला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली .ती कोण्यातरी प्रिया जोशी नावाने होती. जास्त करून मला तर पुरुष मंडळींच्याच रिक्वेस्टी येत असतात.

पण ह्या वेळी एका मुलीने रिक्वेस्ट पाठवली त्यामुळे मी आश्चर्यचकीत होणं सहाजिक होतं.
एक्सेप्ट करायच्या आधी सवयी प्रमाने मी तिचं प्रोफाईल चेक केलं तर समजलं की अजूनपर्यंत तिच्या मित्र यादीत कोणीच नाहीये.
थोडी शंका आली की कोणाचं फेक अकाउंट तर नसेल? नंतर विचार केला की असंही असू शकतं की फेसबुकने ह्या यूजरला नवं समजून माझ्या सोबत मैत्री करण्यासाठी सज्जेस्ट केलं असावं. प्रोफाइल फोटोची जागा रिकामी बघून मी आंदाज लावला बहुतेक नवीन असेल व तिला फोटो अपलोड करता येत नसेल किंवा संकोचली असेल. तर शेवटी मी तिची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली.
सगळ्यात पहिले तिच्याकडनं धन्यवाद म्हणून मेसेज आला. मग माझ्या सगळ्या स्टेटसवर लाईक आणि कॉमेंटस मिळायला सुरूवात झाली.
अापल्या पोस्टींची कदर करणारी ही नविन मैत्रीण मिळाली म्हणून मी खूप आनंदीत झालो. हा प्रकार पुढं पुढं वाढत गेला व आता मला माझ्या वैयक्तीक आयुष्याविषयी प्रश्न यायला लागले. मला काय आवडतं काय नाही याविषयी विचारपूस व्हायला लागली.
अाता तर ती थोड्याफार रोमँटिक शायरी पण पोस्ट करायला

एक दिवस ह्या बाईसाहेबाने विचारलं : तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेम करता का?
मी लगेच म्हणालो: हो तर.
ती गप्प बसली.
दुसऱ्या दिवशी तिनं विचारलं : तुमची मॅडम सुंदर असेल ना ?
ह्यावेळेसही मी तेच उत्तर दिलं: हो खूपच सुंदर आहे.
त्याच्या पुढल्या दिवशी म्हणाली : तुमची बायको स्वयंपाक चांगला बनवते का ?
” खूपच रूचकर आणि जबरदस्त ” मी उत्तर दिलं “.
मग काही दिवस ती गायब झाली.
अचानक काल सकाळी तिनं मैसेज बॉक्स मध्ये लिहलं “मी तळेगावात आलेय . तुम्ही मला भेटणार का?
मी म्हणालो : जरूर भेटेन की.
“तर मग ठीक आहे फन सिनेमाला या. आपली भेटही होईल आणि राबता पिक्चर पण पाहणं होईल.
मी म्हणालो नको मॅडम तुम्हीच माझ्या घरी या. तुम्हाला भेटून माझ्या बायकोलाही आनंद होईल. माझ्या बायकोच्या हातचा स्वयंपाक सुद्घा चाखून बघा.
म्हणाली : नाही, मी तुमच्या मॅडमसमोर नाही येणार तुम्हाला यायचं तर या.
मी तिला माझ्या घरी बोलवायचा खूप प्रयत्न केला. पण ती सारखं सारखं फन सिनेमाला यायचाच हट्ट करत राहीली व मी माझ्या घरी.
ती चिडली व म्हणाली : ठीक आहे मी परत जाते आहे. तुम्ही भेकड घरातच बसा.
मी तिला परत समजावयचा बराच प्रयत्न केला आणि सार्वजनिक ठिकाणी भेटायचे धोकेही सांगितले पण तिनं ऐकलं नाही.
शेवटी हार मानून मी म्हणालो: मला भेटायचं तर माझ्या कुटुंबियांसमोर भेट अन्यथा घरी जा.
ती ऑफलाइन झाली. सायंकाळी घरी पोहचलो तर डायनिंग टेबलावर भन्नाट अशी मटन करी बनवून तयार होती.
मी बायकोला विचारलं: आज कोणी येतं आहे का आपल्या घरी जेवायला?
बायको म्हणाली: प्रिया जोशी येतेय.
काय?
ती तिला कुठं भेटली? तू तिला कसं ओळखतेस?
“जरा धीर धरा साहेब, ती मीच होते. तुम्ही माझ्या गुप्तहेरी मिशनच्या परिक्षेत पास झालात. यावं माझे खरे जोडीदार माझे सच्चे जीवनसाथी जेवण थंड होतंय.
ताप्तर्य : चान्स मिळाल्यावर बायकोचा मोबाईल चेक केला नसता तर आज ही पोस्ट करायच्या लायक राहीलो नसतो राव
 Men will be men )

Comments

comments

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *